शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून यशस्वी होण्याचे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील नित्रुड या गावातील तुषार पवार या २५ वर्षीय तरुणाने अशीच एक प्रेरणादायी कहाणी घडवली आहे. तुषारने आपल्या मेहनतीवर, चिकाटीवर आणि योग्य निर्णयांवर विश्वास ठेवून अल्पावधीत मोठे यश संपादन केले आहे.
सुरुवातीस तुषार एका खाजगी कंपनीमध्ये फक्त १६ ते १७ हजार रुपये पगारावर नोकरी करत होता. मात्र त्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. त्यामुळे त्याने नोकरी सोडून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याला एका जवळच्या मित्राने नर्सरी व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला आणि तुषारने तो सल्ला मनावर घेतला.