फक्त 250 झाडांमधून लाखोंची कमाई! जाणून घ्या पेरू शेतीचा यशस्वी फॉर्म्युला

Guava Farming : पारंपरिक शेती पद्धतीत सातत्याने बदल होत असून, कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल झपाट्याने वाढत आहे. अशा बदलत्या शेतीच्या प्रवाहात फळबाग शेती एक आशादायक पर्याय बनून समोर येत आहे. त्यातही पेरू शेती ही विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरते आहे. पेरू हे फळ केवळ चविष्टच नाही तर पोषणमूल्यांनी भरलेले असून बाजारात त्याला वर्षभर चांगली मागणी असते. त्यामुळे या पिकातून वर्षभर उत्पन्न मिळू शकते.

पेरू लागवडीचा खर्च तुलनेत कमी असून, उत्पादन क्षमतेनुसार फायदा मात्र मोठा असतो. एक एकर क्षेत्रात 200 ते 250 झाडांची लागवड सहज करता येते. एक झाड सरासरी 30 ते 50 किलो फळे देते. म्हणजेच, एकराला किमान 6,000 किलो ते जास्तीत जास्त 12,000 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते. बाजारभाव 20 ते 50 रुपये किलोपर्यंत मिळाल्यास एकरमागे उत्पन्न हे 2.5 ते 4 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *