PM किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तारीख समोर, पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

PM Kisan 20th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही देशातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ६,००० रुपये जमा करते. प्रत्येक टप्प्यात २,००० रुपयांचा हप्ता दिला जातो. सध्या शेतकरी २०व्या हप्त्याची (PM Kisan 20th Installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण खरीप हंगाम सुरू झालेला असून, त्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आदींसाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे.

जून २०२५मध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजूनही केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही अंदाजानुसार, १५ जून २०२५ नंतरच हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागे एक प्रमुख कारण म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *