शेतकऱ्यांनो! PM-Kisan पोर्टलमध्ये 6 बदल, तुमचा हप्ता अडणार नाही ना? वाचा सविस्तर

PM Kisan Portal Updates : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) अंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करून त्यांना शेतीसाठी आर्थिक बळकट करण्यासाठी राबवण्यात येते. २० वा हप्ता अद्याप जाहीर झालेला नसला तरी, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर काही महत्त्वाचे बदल आणि नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. हे बदल शेतकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आले असून, डिजिटल पद्धतीने योजना वापरणे अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल.

सर्वप्रथम, आता शेतकरी स्वतःचा मोबाईल नंबर पोर्टलवरून थेट अपडेट करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना योजनेशी संबंधित कोणतीही माहिती, हप्त्याची स्थिती, तांत्रिक अडचणींची माहिती थेट त्यांच्या मोबाइलवर मिळू शकते. यासाठी ‘Update Mobile Number’ या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो आणि नवीन नंबर नोंदवावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *